MPSC मध्ये नेमकी स्पर्धा आहे तरी किती? | MPSC Exam competition

नमस्कार परीक्षार्थी मित्रांनो, ह्या Blog Post मध्ये आपण MPSC परीक्षेमध्ये नेमकी स्पर्धा(MPSC Exam competition) किती आहे आणि त्या बद्दल च्या अनेक मुद्यांचे विश्लेषण करणार आहोत. हा Blog पूर्ण वाचल्यावर आपल्याला कळेल की, MPSC परीक्षेची तयारी करताना कोणत्या गोष्टींची आपण काळजी घेतली पाहिजे? तयारी करण्याची नेमकी काठीण्य पातळी(MPSC Exam competition) काय असली पाहिजे? आपली स्पर्धा नेमकी कोणत्या व्यक्तींसोबत आहे? आणि आपण किती सातत्य ठेवून अभ्यास केला पाहिजे?

ह्या सर्व वरील प्रश्नांची तुम्हाला उत्तरे भेटली तर तुम्ही अभ्यास करताना होणारा वेळेचा अपव्यय (Time pass) नक्की टाळू शकाल आणि तुमचे अधिकारी/सरकारी नोकरदार होण्याचे स्वप्न नक्की लवकरात लवकर पूर्ण होईल, यात शंका नाही. MPSC (महाराष्ट्र लोकसेवा आयोग) परीक्षांमधील प्रचंड स्पर्धेबद्दल नेहमी बोलले जाते आणि वेग-वेगळ्या माध्यमातून आपण नेहमी अश्या गोष्टी ऐकतच असतो. तसेच अनेकदा परीक्षेची वाढती काठीण्य पातळी, कमी होणाऱ्या जागा आणि दरवर्षी नव्याने तयारीला लागणाऱ्या नवीन उमेदवारांची वाढती संख्या यांसारख्या प्रश्नांमधून परीक्षार्थी मध्ये चिंतां वाढते आणि ही चिंता नाही म्हंटले तरी नक्कीच अभ्यासाच्या गुणवत्तेवर परिणाम करत असते. त्यामुळेच आम्ही हा Blog आकडेवारीच्या माध्यमातून परीक्षार्थीना स्पर्धापारीक्षेच्या खऱ्या स्पर्धेची पातळी(MPSC Exam competition) काय आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतो.

MPSC राज्यसेवा परीक्षेचे उदाहरण वापरून, MPSC परीक्षेच्या स्पर्धेचे खालीलप्रमाणे टप्प्याटप्प्याने विश्लेषण करता येते:

MPSC Exam competition)

एकूण अर्ज भरणारे (Form Fillers): दरवर्षी सुमारे 5 ते 6.5 लाख उमेदवार विविध MPSC परीक्षांसाठी अर्ज (MPSC Portal Link)भरतात. काही वर्षी हा आकडा ८-१० लाख एवढा ही बघण्यात आलेला आहे. यामध्ये विविध दबावाखाली Form भरणाऱ्या परीक्षार्थींची संख्या लक्षणीय असते.

MPSC Exam competition)

प्रत्यक्ष उपस्थित राहणारे (Actual Attendees): यापैकी फक्त 3 ते 3.5 लाख उमेदवार प्रवेशपत्र (Admit Card) डाउनलोड करतात आणि पूर्व परीक्षेला (Preliminary Exam) खऱ्या अर्थाने बसतात. एक लक्षणीय संख्या परीक्षेला उपस्थित राहत नाही. ह्या प्रमाणावरून आपल्या थोडा अंदाज आलेला असेल की नक्की खऱ्या अर्थाने परीक्षेची तयारी करणारे परीक्षार्थी किती (MPSC Exam competition) असतात. चला तर मग आता पुढील आकडेवारी पाहू.

गंभीर नसलेले/अपुरी तयारी (Non-Serious/Unprepared): उपस्थित राहणाऱ्यांपैकी अंदाजे 1.5 ते 2 लाख उमेदवार गंभीरपणे तयारी करणारे नसतात. ते कदाचित इतरांच्या सांगण्यावरून, कुणाच्या दबावाखाली, यशस्वी लोकांची Success Story ऐकून आलेले असतात (हौशी परीक्षार्थी), त्यांच्याकडे अनुभवाची कमतरता असते किंवा त्यांनी केवळ चालू घडामोडी (Current Affairs) सारखे निवडक विषयच अभ्यासलेले असतात. अश्या परीक्षर्थिनी परीक्षेचा Syllabus व्यवस्तीत वाचून समजून घेतलेला नसतो, मागील वर्षीच्या परीक्षा पेपर चे आकलन केलेले नसते त्यामुळे त्यांची संपूर्ण तयारी झालेली नसते. अश्या परीक्षार्थी आपण Direct competition समजू शकत नाही.

MPSC Exam competition)

अंशतः तयार (Partially Prepared): आणखी 50,000 ते 75,000 उमेदवारांची काही विषयांमध्ये (उदा. CSAT) चांगली पकड असू शकते, पण इतर विषयांमध्ये (उदा. GS – सामान्य अध्ययन) ते कमकुवत असतात, त्यामुळे त्यांची तयारी सर्वसमावेशक नसते. ह्याचे मुख्य कारण म्हणजे सर्व परीक्षार्थी यांना परीक्षेतील विषय हे नवीन असतात. सारासार विचार केला तर पदवीधर होई पर्यंत कोणीही जास्त इतिहास, भूगोल, संविधान अश्या विषयामध्ये हात घातलेला नसतो (ह्या काही अपवाद आहेत, जसे की BA करणारे परीक्षार्थी, त्यांना MPSC परीक्षेतील बरेच विषय पदवीधर होताना असतात, त्यामुळे त्यांना परीक्षेमध्ये उतरताना त्याचा फायदा नक्कीच होतो.).

गंभीर उमेदवार (Serious Aspirants): यामुळे शेवटी 25,000 ते 40,000 उमेदवारांचा मुख्य गट उरतो, जे परीक्षेबाबत खरोखर गंभीर असतात, सातत्याने (सुमारे 6-8 तास दररोज) अभ्यास करतात आणि आपल्या ध्येयासाठी समर्पित असतात. अश्या परीक्षार्थीना पूर्व (Prelims) तसेच मुख्य(mains) परीक्षेबद्दल संपूर्ण माहिती असते आणि त्या दिशेने त्यांची तयारीही सुरु असते. परंतु Syllabus बऱ्यापैकी मोठा असल्यामुळे सर्वांकडून सर्व विषयांना न्याय देणे होत नाही. परंतु हे सर्व परीक्षार्थी पूर्व परीक्षा मध्ये यशस्वी होण्याचे प्रमाण खूप जास्त असते.

MPSC Exam competition)

पूर्व परीक्षा उत्तीर्ण (Prelims Qualifiers): वरील गंभीर उमेदवारांमधून केवळ 4,000 ते 7,000 उमेदवार पूर्व परीक्षा उत्तीर्ण होतात. ही संख्या त्या वर्षी जाहीर झालेल्या जागांवर (vacancies) अवलंबून असते हे आपल्या सगळ्यांना तर माहितीचा आहे. आयोग पेपर कसा काढेल, किती चालू घडामोडीवर त्यांचे लक्ष असेल याचा अंदाज कोणालाही नसतो. परंतु जो परीक्षार्थी सर्व विषयांना समान मानून अभ्यास तंत्र विकसित करतो आणि तयारी मध्ये सातत्य ठेवतो तो नक्कीच पूर्व परीक्षा पास होतो यात तीळ मात्र शंका नाही.

मुख्य परीक्षा उत्तीर्ण (Mains Qualifiers): पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांपैकी सुमारे 2,000 ते 3,000 उमेदवार मुख्य परीक्षा (Main Exam) पास करतात. पूर्व परीक्षेत (कदाचित नशिबामुळे किंवा चांगल्या CSAT गुणांमुळे) पास झालेले काहीजण GS च्या अपुऱ्या तयारीमुळे येथे बाहेर पडतात. कारण, आपल्या सगळ्यांना तर माहितीच आहे की, मुख्य परीक्षेतील विषयांचे ज्ञान संपूर्ण पद्धतीने असणे गरजेचे आहे, वरून-वरून थोडे आकलन असणाऱ्यांचा येथे निभाव लागत नाही. तसेच भाषेवर प्रभुत्व देखील हवेच!

मुलाखत फेरी (Interview Stage): मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांमधून अंदाजे 900 ते 1,200 उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाते. मुख्य परीक्षा पास होणारा परीक्षार्थी ह्याला बऱ्यापैकी सर्व परीक्षेतील विषयांचे आकलन होवून एक प्रकारे व्यक्तिमत्वाचा देखील विकास झालेलं असतो. तसेच त्यांच्या विचारांमध्ये ही अमुलाग्र बदल झालेलं असतो. परंतु अतिशय महत्वाची फेरी म्हणजे मुलाखत. आपल्या ज्ञानाचे सखोल अध्ययन करून जो कोणी समयसूचकता वापरून मुलाखत घेणाऱ्यांच्या प्रश्नांची समर्पक उत्तरे देतो तो अधिकारी होवूनच पुढे येतो. परंतु वाटते तेवढी ही सोपी फेरी तर नक्कीच नाही, येथे व्यक्तिमत्व, समयसूचकता, ज्ञान, भाषा कौशल्य, आवाजातील चढ-उतार, कल्पकता अश्या अनेक गुणाची तपासणी मुलाखत घेणाऱ्या कडून केली जाते. त्यामुळे सर्व परीक्षर्थिनी (MPSC Exam competition) ह्या गोष्टींची सुद्धा काळजी घेतली पाहिजे.

MPSC Exam competition)

अंतिम निवड (Final Selection): शेवटी, त्या वर्षाच्या जागांनुसार ३०० ते १००० उमेदवारांची अंतिम निवड होते.

महत्त्वाचे मुद्दे (Key Points):

  • अनुभवी/आधीच नोकरीत असलेले: एक अत्यंत महत्त्वाचा गट म्हणजे 300-500 उमेदवार जे आधीच सरकारी पदावर (government post) असतात पण उच्च पदासाठी पुन्हा परीक्षा देतात. ते अनुभवी, आत्मविश्वासू आणि अत्यंत प्रेरित असतात, ज्यामुळे ते मोठी स्पर्धा निर्माण (MPSC Exam competition) करतात.
  • पुन्हा प्रयत्न करणारे (Repeaters): मुख्य परीक्षा/मुलाखत फेरीत पोहोचलेल्यांपैकी सुमारे 1,000-1,500 उमेदवार (MPSC Exam competition) हे आधी या टप्प्यांपर्यंत पोहोचण्याचा अनुभव असलेले असतात.
  • पुनर्निवड (Repeat Selections): दरवर्षी अंतिम निवड झालेल्या उमेदवारांपैकी 20% ते 40% उमेदवार हे असे असतात जे आधीच पदधारक होते किंवा परीक्षेच्या प्रगत टप्प्यांपर्यंत पोहोचले होते.

निष्कर्ष

MPSC परीक्षेमध्ये नेमकी स्पर्धा (MPSC Exam competition) किती?

निष्कर्ष असा आहे की (MPSC Exam competition) अर्जदारांनी आपला परीक्षेचा अर्ज भरताना वरील सर्व गोष्टींचे आकलन करून मगच निर्णय घेतला पाहिजे. कारण, काही प्रवर्गातील परीक्षार्थीना मर्यादित वेळा परीक्षा देता येते. सुरुवातीची संख्या खूप मोठी वाटत असली तरी, खरी, गंभीर असणारे उमेदवार फार कमी असतात हे आपल्या लक्षात आलेच असेल. परंतु पूर्व परीक्षा नंतरच्या फेरी मध्ये स्पर्धा ही खूप लहान किवां संख्या कमी वाटत असली तरी, अधिक समर्पित गटापुरतीच मर्यादित असते. आपण कोणत्या गटात मोडतो याचे प्रामाणिकपणे मूल्यांकन करण्यास आणि खऱ्या स्पर्धकांविरुद्ध यशस्वी होण्यासाठी सातत्यपूर्ण, गंभीर तयारीच्या महत्त्वावर नेहमी जोर द्या आणि परीक्षेची तयारी करा! आपल्या सर्वाना tattvaeducation.com तर्फे परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा!